संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या तीन विद्यार्थिनींची जाबिल सर्किट इंडिया कंपनीमध्ये निवड

0
जयसिंगपूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट मधील डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीरिंगच्या तीन विद्यार्थिनींची ‘जाबिल  सर्किट  इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’  कंपनीमध्ये निवड झाली आहे.यामध्ये कु.मुस्कान वाहीद मुजावर, कु.श्रद्धा नकाते,कु.चैत्राली डेविड कांबळे यांचा समावेश आहे.दरवर्षी संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल अंतर्गत विविध राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. जाबिल  सर्किट  इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एक प्रख्यात कंपनी असून भारतभर तसेच विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे.

नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या तीन विद्यार्थिनींची निवड करण्यात आली  आहे.  या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. आशिष पाटील  समन्वयक  प्रा. दीपक कांबळे, प्रा.आकाश घस्ते यांचे सहकार्य लाभले.या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य  डॉ. विराट व्ही गिरी, अकॅडमीक डीन प्रा. प्रशांत पाटील, व विभागप्रमुख प्रा. रवींद्र धोंगडी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.