जत(राजू माळी) : संख ता.जत येथील नागरिकांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास विकासकामातून आम्ही सिध्द केला आहे.यापुढे लोकांच्या हिताचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील,असे प्रतिपादन माजी सभापती डॉ. आर.के.पाटील यांनी केले.
संख येथे ग्रामपंचायतीने उभारलेल्या तिसऱ्या शुध्द पाण्याच्या प्लँटच्या उद्घाटन प्रंसगी डॉ.पाटील बोलत होते.
संख येथील नागरिकांना शुद्ध,मुबलक पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे.क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू नये यासाठी ग्रामपंचायतीने आतापर्यत सुमारे 12 लाखाचा निधी खर्चून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ,मशिदीनजिक व तीसरा बसवेश्वर चौकात असे तीन पाणी शुध्दीकरण प्लँट उभारले आहेत.
डॉ.पाटील म्हणाले,लोकांच्या हिताला ग्रामपंचायतीकडून प्राथमिकता दिली जाते.नागरिकांच्या महत्वाचे असणारे,पाणी,विज,रस्ते,गटारी,चौकाचे शुशोभिकरण,स्टँड परिसर असे अनेक प्रश्न आम्ही गेल्या चार वर्षात सोडविण्यात यशस्वी झालो आहोत.यापुढेही आम्ही गावच्या समस्या पुर्णत: सुटल्या पाहिजेत यासाठी प्रयत्नशील राहू.
संरपच मंगलताई पाटील म्हणाल्या,नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आमचा कटाक्ष होता.पाण्यामुळे अनेक आजार होतात.त्यामुळे शुध्द पाणी उपलब्ध झाले पाहिजे यासाठी आम्ही पाणी शुध्दीकरण प्रणाली अवलंबण्याचे ठरविले होते.त्यानुसार ग्रामपंचायतीकडुन तीन पाणी शुध्दीकरण प्लँट उभे केले आहेत.या तिन्ही प्लँटमधून एक रूपयात एक लीटर व पाच रूपयात वीस लीटर असे अत्याधुनिक मशिनद्वारे शुध्द पाणी नागरिकांना उपलब्ध झाले आहे.
क्षारयुक्त पाण्यामुळे
नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ नये,यासाठी आम्ही गावात अल्प दरात पाणी मिळावे यासाठी हे तीन शुध्दीकरण प्लँट उभारले आहेत.यामुळे आता संपुर्ण गावांना पुरेल इतके शुध्द पाणी उपलब्ध झाले आहे.
यावेळी ग्रामविकास अधिकारी कुशाबा नरळे,माजी उपसंरपच एम.आर.जिगजेनी,सदाशिव दर्गाकर,विद्यमान उपसंरपच ज्ञानेश्वर कोळी,ग्रा.प.सदस्य अमर कांबळे,ग्रामपंचायतीचे कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.
संख ग्रामपंचायतीच्या तिसऱ्या पाणी शुध्दीकरण प्लँटचे लोकार्पण माजी सभापती डॉ.आर.के.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.