सांगोला: शैक्षणिक वर्ष २०२३-२४ व्दितीय वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठी फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँण्ड रिसर्च या महाविद्यालयात शासनमान्य व्दितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या सुविधा केंद्रामार्फत इंजिनिअरिंग प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया दिनांक १४ जूलै पासून सुरु झाली असल्याची माहिती फॅबटेक टेक्नीकल कॅम्पसचे संचालक डॉ.डी.एस.बाडकर यांनी दिली.