जत,संकेत टाइम्स : जत दौऱ्यावर असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना आशा व गटप्रवर्तकांच्या मानधन वाढीबाबत येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विषय मांडावा याबाबतचे निवेदन कॉ.हणमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली आशांनी दिले.
महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ७० हजार आशा व ४ हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. त्यांना कामावर आधारित मोबदला मिळतो.तो सुध्दा अत्यंत अत्यल्प आहे, त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाहरी भागत नाही.
आशांना कामगार कायद्याखाली कोणतेही सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळत नाहीत.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे काम करीत असून त्या आरोग्य विभागाचा कणा आहेत.कोरोना काळात त्यांची उपलब्धता सिध्द झाली आहे.त्यामुळे आपण येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आशा व गटप्रवर्तक यांच्या मानधन वाढ हा विषय मांडून आवाज उठवावा अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी आशा स्वयंसेविका रेशमा शेख, सरिता व्हनकंडे उपस्थित होत्या.
जत येथे आलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन देताना कॉ.हणंमत कोळी व आशा वर्कर्स