जिल्ह्याभर सर्वत्र द्राक्षबागांसह पालेभाज्यांची शेती वातावरणातील बदलामुळे प्रंचड तोट्यात आहे.अनेक वेळेस दर कोसळल्याने पिकांच्या उत्पादनाचे खर्चही निघत नाही.त्यामुळे भाजीपाला उत्पादकांना डोक्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होत आहे.ज्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, तोच उपाशी राहतो.मात्र, यंदा टोमॅटोने शेतकऱ्यांना तारले आहे.टोमँटोने टाकळी येथील प्रीतम पाटील व बोलवाड येथील दीपक पाटील या दोन तरुण शेतकऱ्यांना लक्षाधिस बनविले आहे.दोघेही गेल्या पाच वर्षापासून टोमॅटोचे उत्पादन घेतात. अनेकदा तोटाही सहन करावा लागला. मात्र,त्यांनी जिद्द सोडली नाही.
दोघांनी ३० गुंठ्यात अथर्व जातीच्या टोमॅटोच्या रोपांची मार्चमध्ये लागण केली. त्याची पहिली तोडणी ९० दिवसांनंतर सुरू झाली. २० रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत दर मिळाला.दोन महिन्यापासून सुमारे १५ टन टोमॅटो कोल्हापूर, वडगाव, बेळगाव, आंध्र प्रदेशातील बाजारात गेले. पुढील काही दिवसात आणखी पाच टन टोमॅटो होतील. यातून दहा लाखाचे उत्पन्न मिळणार आहे.टोमँटोचे दर असेच चढेच राहिल्या उत्पन्नात वाढ होणार आहे.