श्री.प्रतिष्ठान भारतनाना भालके करियर अकॅडमी बालाजीनगर प्रशिक्षण संस्थेत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या 200 मुला-मुलींना आयपीएस अधिकारी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना नयोमी साठम म्हणाल्या की, प्रशिक्षणार्थीने सातत्यता ठेवून अभ्यास केला पाहिजे, मोटिवेट व्हायचं असेल तर आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे तरच ते साध्य करता येतं. माझं ध्येय सातवी आठवीत असताना UPSC करून अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित होतं म्हणूनच मी वयाच्या 22 व्या वर्षी IPS अधिकारी बनले.
ज्याच्या कडे जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची धमक आहे, त्याला शासकीय प्रशासकीय सेवा करण्याची संधी मिळतेच. वेळेचे योग्य नियोजन कामाबद्दल आवड आणि आस्था ठेवा. मोबाईल हे एक व्यसन आहे पोलीस सेवेत पोलीस शिपाई ,पोलीस अधिकारी किंवा अन्य कोणत्याही सेवेत स्वप्न साकार करायचं असेल असेल तर मोबाईल पासून जास्तीत जास्त दूर राहणं पसंत करणं विद्यार्थ्यांसाठी चांगलं असेल. मोबाईल बघून यूट्यूब व्हिडिओ इतरांची स्टोरी ऐकून तात्पुरतं मोटिवेट होऊन कोणतीही गोष्ट होत नाही. त्यासाठी आपली अभ्यासाप्रती असणारी एकनिष्ठता वेळेचा चांगला नियोजन करा यश नक्की मिळत.चांगल्या मोकळ्या वातावरण मध्ये अकॅडमीत आहात चांगली तयारी करा, पोलीस खात्यात या आपल स्वागत आहे असेही बोलले.
साठम पुढे म्हणाल्या,श्रीकांत पवार सर सुरू केलेल्या प्रशिक्षण संस्थेत आज 200 विद्यार्थी विशेषता मोठ्या प्रमाणात मुली प्रशिक्षण घेत आहेत यांना मार्गदर्शन मिळावं त्यांच्यात उत्साह, प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून मंगळवेढ्याच्या कर्तव्यदक्ष आपल्या कामाने वचक आणिदरारा निर्माण केलेल्या मंगळवेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांना शिक्षण संस्थेला भेट देण्याची विनंती केली असता भेट दिली.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि अनेक त्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला.
यावेळी संस्थेच्या वतीने श्रीकांत पवार सर यांनी येतोचित शाल, श्रीफळ, फेटा देऊन मानसन्मान करुन आभार मानले.यावेळी आप्पासाहेब पवार सर, पुजारी सर,विकास पवार सर सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.