डफळापूर बसस्थानकांसाठी माजी सैनिक रस्त्यावर | जत-सांगली रस्त्यावर ठिय्या 

0
डफळापूर : डफळापूर ता.जत या प्रमुख ऐतिहासिक गावातील सुसज्ज बसस्थानक व्हावे म्हणून कॉ.हणमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी सेवा भावी सैनिक संघटनेकडून जत-सांगली रस्ता रोकत प्रशासनाचा निषेध केला.यावेळी बसस्थानकासह जत तालुका दुष्काळ जाहीर करावा यासह अनेक मागण्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,डफळापूर हे गाव 25 गावाचा केंद्र बिंदू असलेल्या जत सांगली रस्त्यावरील डफळापूरमध्ये 1967 साली बसस्थानक बांधण्यात आले आहे.आतापर्यंत संबंधित विभागाने कधीही या बसस्थानकाची एकदाही दुरुस्ती केलेली नाही.त्यामुळे दुर्लक्षित असलेले हे बसस्थानक पुर्णत: कोसळले आहे.सध्य स्थितीत प्रवाशांना गाडीची वाट पहात रस्त्याकडेला उन्ह,वारा व पाऊसात उभे रहावे लागत आहे.याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे,आम्ही अनेकवेळा संबधितांना निवेदन दिली आहेत.तरीही येथे बसस्थानक बांधण्यात आलेले नाही.या रास्ता रोकोतून प्रशासनाला आम्ही इशारा देत आहोत.येत्या काळात येथे सुसज्ज बसस्थानक उभारावे,त्याचबरोबर सध्या जत तालुक्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले
आहे.

Rate Card
शेतकरी हवालदिल झाला आहे.विहिरी ने पाण्याचा तळ गाठला आहे.म्हणून जत तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्यात यावा.त्याचबरोबर जनावरांच्या साठी चारा डेपो चालू करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या वर दोबारा पेरणीचे संकट उभे राहिले आहे तरी पंचनामे करून भरपाई देण्यात यावी.अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी कॅनलमध्ये गेल्या‌ आहेत.त्याचे  भूसंपादन करून कायदानुसार 5 पट भरपाई देण्यात यावी.डफळापूर तलाव कोरडा पडला आहे,तेथे म्हैसाळ कॅनलचे पाणी सोडून भरून देण्यात यावे.राज्य महामार्ग डफळापूर ते अनंतपूर या रस्त्याचे उर्वरित कामाला लवकर मंजुरी देण्यात यावी.डफळापूर महावितरणच्या सब स्टेशनवर पडणारा लोड कमी करुन अंकले सब स्टेशन तातडीने सुरू करावे.अशा मागण्या आम्ही या आंदोलनद्वारे शासनाला कळविल्या आहेत.शासनाने दखल घेऊन आमच्या मागण्या पुर्ण कराव्यात,अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कॉ.हणमंत कोळी यांनी दिला आहे.

 

या आंदोलनाला खलाटी गावचे संरपच लता देवकते,राष्ट्रवादी काँग्रेसचे बी.आर.पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर चव्हाण, अभिजीत चव्हाण,हर्षवर्धन चव्हाण,दिपक कांबळे,धनाजी चव्हाण,अमिर नदाफ,गौस मकानदार अमित उबाळे यांनी पांठिबा दिला. दिलीप जाधव,शिवाजी नाईक,अनिल माने,सुधाकर माळी,वसंत बंडगर,सुदाम सवदे,जयवंत सवदे,ईलाई नदाफ,बाबासो शिंदे,आप्पासो आकळे,राजाराम सवदे,अरविंद वठारे,मधूकर कदम,तानाजी माळी,मनोहर चव्हाण,धनाजी चव्हाण आदीनी आंदोलनात सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.