विक्रम फौंडेशनकडून माडग्याळ येथे वह्या वाटप 

0
1
माडग्याळ : जतचे पाणीदार आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील गरीब, कष्टकरी, मागास मुलामुलीकरिता शिक्षणासाठी मदत म्हणून विक्रम फौंडेशन मार्फत माडग्याळ ता.जत येथील जिल्हा परिषदेच्या ९ शाळांना लेखन साहित्य म्हणून प्रत्येकी 2 प्रमाणे 400 विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप केले.यावेळी संस्थेचे कार्यवाहक यश अभय सावंत हे उपस्थित होते.शाळेच्या वतीने विक्रम फौंडेशनचे कार्यवाहक यश सावंत यांचा मुख्याध्यापक मुरगेंद्र पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

 

यावेळी या कार्यक्रमासाठी उपसरपंच सविता मच्छिन्द्र सावंत, काँग्रेस नेते व्हनापा माळी, माजी उपसरपंच लक्ष्मण कोरे, राष्ट्रवादी नेते-मारुती कोरे, माजी सरपंच अप्पू जत्ती, जेष्ठ नेते भिमु  माळी, तुकाराम बंडगर,निंगप्पा कोरे, प्रभाकर चौगुले, बाळू कोरे, संजीव सावंत, राजेंद्र कांचनकोटी, सुरेश नाटेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन वसंत सावंत,विकी वाघमारे, सागर ऐवळे यांनी केले. यावेळी माडग्याळ भाग शाळातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.सूत्रसंचालन संतोष काटे यांनी तर आभार मलकारी निकम यांनी मानले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here