उद्योजकतेसाठी कौशल्ये सुसज्ज करण्याचे धोरणात्मक महत्त्व

0
कौशल्याचे मानवी जीवनात असलेले महत्व ओळखून संयुक्त राष्ट्रसंघाने १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day)  केला जातो. भारत देशाचे माननीय पंतप्रधान यांनी कौशल विकास योजना सुरू केली आहे. पहिला जागतिक युवा कौशल्य दिन १५ जुलै २०१५ रोजी साजरा करण्यात आला. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान कौशल विकास योजना भारतात सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत शासनाकडून युवकांना विविध क्षेत्रातील मोफत औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकास प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, भाषा विकास कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. कौशल विकास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक युवतींना  रोजगार मिळविने सोपे झाले आहे. १४ ते ४५ वयोगटातील युवक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षापर्यंत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचा पर्याय पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, सरकारकडून एक कौशल्य विकसित प्रमाणपत्र दिले जाते ते प्रमाणपत्र रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी देशभरात वैध आहे.
जागतिक युवा कौशल्य दिनाचा इतिहास :
बेरोजगारीची आव्हाने कमी करण्यासाठी तसेच त्यांना युवक युवतींना आपल्या आवडीचे कौशल्य निर्माण करण्यासाठी जगभरातील तरुणांमध्ये जागरुकता पसरवण्याची मागणी लक्षात घेऊन जागतिक युवा कौशल्य दिन अस्तित्वात आला  आहे.  १५ जुलै रोजी प्रथमच जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून, तो दरवर्षी १५ जुलै रोजी साजरा केला जातो.
जागतिक युवा कौशल्य दिनाचे उद्दिष्ट :
जगातील तरुणांना रोजगार, काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करणे हा जागतिक युवा कौशल्य दिनाचा मुख्य उद्देश आहे. युवकांना जास्तीत जास्त कौशल्य विकासाची जाणीव करून देणे हा या दिवसाचा उद्देश मानला जात आहे. जेणेकरून युवक युवतींना चांगल्या संधी शोधून रोजगार व स्वयंरोजगार मिळू शकेल.
जागतिक युवा कौशल्य दिनाचे महत्त्व :
२०१४ मध्ये, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला आणि युवकांना रोजगार, सभ्य काम आणि उद्योजकतेसाठी कौशल्ये सुसज्ज करण्याचे धोरणात्मक महत्त्व साजरे केले. तेव्हापासून, जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमांनी सुरुवात करून तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण विविध संस्था, कंपन्या, नियोक्ते आणि कामगार संघटना, धोरणकर्ते आणि विकास भागीदार यांच्यात संवाद साधण्याची अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे. जग विकासाच्या शाश्वत मॉडेलच्या दिशेने वाटचाल करत असताना कौशल्याचे सतत वाढत जाणारे महत्त्व सहभागींनी कौशल्य विकासाची गरज अधोरेखित केली आहे.
जागतिक युवा कौशल्य दिन कसा साजरा केला जातो :
या दिवसाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित स्पर्धांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये विविध देशांतील युवक विज्ञान, कला आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रात आपले कौशल्य दाखवून कार्यक्रमात सहभागी होतात. भारतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली “स्किल इंडिया” मोहीम म्हणून जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जात आहे. या योजनेचा अनेक युवक युवतींना फायदा झाला असून देशाच्या विकासासाठी आणि विविध मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी या योजनेचा लाभ युवक युतीने घेऊन आपला सर्वांगीण विकास केलेला आहे.
Rate Card
कौशल्य विकास प्रशिक्षण :
राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून निश्चित करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासविषयक प्रशिक्षण. – केंद्र सरकारच्या कौशल्य विकास धोरणानुसार महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे १४ ते ४५ या वयोगटातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते आहे.
जागतिक युवा कौशल्य दिन २०२३ ची थीम :
जागतिक युवा कौशल्य दिनाची थीम “कौशल्य शिक्षक, प्रशिक्षक आणि परिवर्तनशील भविष्यासाठी युवक” आहे. २०२३ ची थीम कौशल्यपूर्ण शिक्षक आणि प्रशिक्षक, परिवर्तनशील भविष्यासाठी युवक युवतींना श्रमिक बाजारपेठेत जाण्यासाठी आणि त्यांच्या समुदायांमध्ये आणि समाजांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी कौशल्ये सादर करण्यासाठी सक्षम विकसित व्हावी आणि  शिक्षक, प्रशिक्षक आणि इतर शिक्षकांची आवश्यक भूमिका पूर्ण व्हावी ही थीम २०२३ ची आहे.
ज्या युवक युवतीने या योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांनी विविध कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन आपल्या आवडीचे कौशल्य विकास प्रशिक्षण आत्मसात करून आपला सर्वांगीण विकास करून रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करावा. या २०२३ जागतिक युवा कौशल्य  दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….
प्रा. अजय बी. कोंगे
विभाग प्रमुख,
कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.