जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सुसाट सुटलेल्या वाळू तस्करांना रोकण्यात जत,संख महसूल विभाग अपयशी ठरला असून मोठ्या रक्कमेचे हप्ते घेऊन महसूल मधील काही झारीतील शुक्राचार्याचे वरदान वाळू तस्करांना मिळाल्याची चर्चा आहे.
परिणामी दिवसाढवळ्या वाळूचे डंपर,टँक्टर भरून गावागावात वाळू तस्करी सुरू आहे, हे पोलीसांनी शनिवारी केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
जत तालुक्यातील वाळू तस्करी सर्वज्ञात आहे.काही वर्षीपुर्वी बोटावर मोजण्याएवढे असलेले वाळू तस्कर आता मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
राजकीय,माध्यमाची झूल पांघरून काहीजण महसूलच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्यांने बेधडक वाळू तस्करी करत आहे.
अगदी अशा तस्करांची अधिकाऱ्यांनी पकडलेली वाहने सोडविण्यासाठी काही कर्मचारी कार्यरत आहेत.मोठा लाभाचा विभाग असल्याने अनेक कर्मचाऱ्यांत चढाओढ लागत आहे. त्यात काही कर्मचारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने शिरजोर होऊन बसले आहेत. थेट वाळू तस्करांच्या बरोबर उठबस करणारे कर्मचारी,अधिकारी कशी वाळू तस्करी रोकतील हा संशोधनाचा विषय आहे.
त्यामुळे तालुक्यातील वाळू तस्करांना पायबंद घालायचा असेलतर जिल्हाधिकारी यांनी अन्य तालुक्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नेमण्याची गरज आहे.