इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

0

उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थिनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते.

 

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लाख रूपये व पदरेशी अभ्यासक्रमासाठी 20 लाख रूपये इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येते.

राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रम – आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिकय व व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषी, अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान.

राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च याचा समावेश राहील.

परदेशी अभ्यासक्रम – आरोग्य  विज्ञान, अभियांत्रिकी,  व्यावसायिक  व  व्यवस्थापन, विज्ञान व कला.परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील.

योजनेचे स्वरुप व सहभाग

देशांतर्गत अभ्यासक्रमाकरीता 10 लाख रूपये तसेच परदेशी अभ्यासक्रमाकरीता 20 लाख रूपयेच्या  मर्यादेत बँकेने मंजूर केलेल्या कर्जाचे विद्यार्थ्याने वेळेत हप्ते भरल्यास त्यामधील व्याजाची रक्कम 12 टक्केच्या मर्यादेत विद्यार्थ्यांच्या आधारलिंक खात्यात महामंडळामार्फत व्याज परतावा जमा करण्यात येते.

विद्यार्थ्यांची पात्रता

अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व इतर मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे. इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह पास असलेले विद्यार्थी पात्र राहतील. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता 8 लाख रूपये पर्यंत व शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत असावी.

 

Rate Card

 

इतर अटी व शर्ती

परदेशी अभ्यासक्रमांतर्गत शैक्षणिक कर्ज घेतलेल्या लाभार्थीनी व्याज परतावा मागणी करताना पुढील बाबी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील.  परदेशी अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) च्या रँकिंग / गुणवत्ता निकषांनुसार संस्थेचे स्थान 200 पेक्षा आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी. परदेशी अभ्यासक्रमाकरीता पात्रता परीक्षा Graduate Record Exam (GRE), Test of English as a Foreign Langauage (TOEFL) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

अर्ज करण्याची पद्धत

 

अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने www.msobcfdc.org या संकेतस्थळ / वेबसाईटवर अर्ज सादर करावा.

संपर्क :

जिल्हा व्यवस्थापकमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,  जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली. दूरध्वनी क्र. 0233-2321513.

                                                        

संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.