जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सहा नव्या ग्रामपंचायतीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत महसूल प्रशासनाला दिल्या.बैठकीत जत शहरातील विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर केलेली अतिक्रमणे व कोरोणाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे,तहसीलदार सचिन पाटील,गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,माजी सभापती बाबासाहेब कोडग,कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे यांच्यासह ग्रामसेवक,तलाठी,डॉक्टर आदी उपस्थित होते.
आमदार विक्रमसिंह सांवत म्हणाले, तालुक्यातील काही गावातील वाड्याचे अंतर पाच किलोमीटर आहे,तेथे लोकसंख्याही वाढत आहे.नागरिकांच्या विकासाच्या व इतर सोयी-सुविधांच्या दृष्टीने स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन करण्याची गरज आहे. अशा तालुक्यात सात ग्रामपंचायती स्थापन होऊ शकतात.
आ.सांवत म्हणाले,कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मात्र तिसऱ्या लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे आरोग्य,नगरपरिषद,
ग्रामपंचायतीने दक्ष रहावे.
आमदार सावंत म्हणाले की,संभाव्य
तिसऱ्या लाटेसाठी आपण सज्ज व सतर्क राहिले पाहिजे.यावेळी खाजगी लहान मुलांच्या दवाखान्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. गरज पडल्यास 40 ते 50 ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल सुरू करता येईल.शिवाय भविष्यात आयसोलेशनसाठी गुडापूर येथे व्यवस्था करता येईल असेही प्रांताधिकारी यांनी सांगितले.
प्रांताधिकारी प्रंशात आवटे म्हणाले,राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी जत -गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर केलेली अतिक्रमणे केलेल्या अतिक्रमण धारकांची यादी काढावी.सदरची यादी तहसीलदार यांच्याकडे द्यावी.त्यानंतर अतिक्रमणे करणाऱ्या नागरिकांना नोटीस देऊन ही अतिक्रमणे काढण्यात येतील. तर तालुक्यातील जिरग्याळ ग्रामपंचायत हद्दीतील शेळकेवाडी,रामपूर ग्रामपंचायत हद्दीतील मल्लाळ,सनमडी ग्रामपंचायत हद्दीतील मायथळ,व्हसपेठ ग्रामपंचायत हद्दीतील राजोबाचीवाडी,उमदी ग्राम पंचायत हद्दीतील विठ्ठलवाडी तर पांडोझरी ग्रामपंचायत हद्दीतील पारधी वस्ती तर पाच्छापुर ग्रामपंचायत हद्दीतील सालेकिरी अशा सात गावच्या नव्याने ग्रामपंचायतीची निर्मिती होऊ शकते. विशेष ग्रामसभा घेऊन तसे ठराव करावेत.शिवाय नव्याने ग्रामपंचायती स्थापन करण्यासाठीचे प्रस्ताव ग्रामसेवक, तलाठी यांनी द्यावेत.यावेळी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चर्चा करण्यात आली.
डॉ.सचिन वाघ यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी स्त्रियांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना केली.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, जत शहरातील बालरोग तज्ञ डॉ.सचिन वाघ, डॉ.सरिता पट्टणशेट्टी,डॉ.अभिजित पाटील,डॉ.नितीन पतंगे,डॉ.प्रतीक पाटील,डॉ. विद्याधर पाटील,डॉ.उमा पाटील,डॉ.विशाल खोत,डॉ.मीनाक्षी पवार आदी उपस्थित होते.