संखमध्ये ३२ गावांचे प्रंलबित खटल्यांचे कामकाज चालणार | रविवारी होणार उद्घाटन

0
सांगली : जत तालुक्यातील संख येथे ग्राम न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या हस्ते व न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या उपस्थितीत आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सांगली प्रदीप शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि. 30 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. अशी माहिती जिल्हा न्यायालयाचे प्र. प्रबंधक यांनी दिली.

 

 

हे ग्राम न्यायालय आवठ्यातून एकदा प्रत्येक सोमवारी संख येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यरत राहील. या ग्राम न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात संख, दरीबडची, लमणतांडा (उ), खंडनाळ, पांढरेवाडी, सिध्दनाथ, जालीहाळ खुर्द, कागनरी, मोटेवाडी, पांडूझरी, भिवर्गी, अंकलगी, कुलाळवाडी, करजगी, बोर्गी बु. बोर्गी खुर्द, अक्कलवाडी, मोरबगी, गिरगाव, लवंगा, को. बोबालाद, तिकोंडी, जलहिळ बु., कोनबगी, करेवाडी ति., करेवाडी कोबो, गोंधळेवाडी, आसंगी तुर्क, गुड्डापूर, असांगी जत, तिल्याळ, सोरडी या 32 गावांचे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचे कामकाज सुरू राहील. ग्राम न्यायालयाचे न्यायाधिकारी म्हणून जत येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एकनाथ चौगुले हे न्यायाधिकारी म्हणून कामकाज पाहतील.
संख येथील ग्रामन्यायालय सुरू झाल्याने दुर्गम भागातील 32 गावातील नागरिकांना त्याचा लाभ होईल तसेच त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळ न्याय उपलब्ध झाल्यामुळे पर्यायाने त्यांचा वेळ, पैसा व दूरवरून न्यायालयात जाण्या-येण्यासाठी होणारा त्रास कमी होईल.

 

 

या ग्राम न्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातील सर्व न्यायीक अधिकारी, शासकीय अधिकारी, जत तालुका विधीज्ञ संघाचे अध्यक्ष वकील शिवशंकर खटावे, सर्व विधीज्ञ व संख परिसरातील ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.