जत : सांगली जिल्ह्यात जत तालुका हा विस्ताराने,भौगोलिक दृष्ट्या व लोकसंख्येने प्रचंड मोठा असून जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळ सुमारे २,२५,८२८ हेक्टर असणारा तालुका आहे. सांगली जिल्ह्यातील अन्य तालुक्याचे क्षेत्रफळ हे जत तालुक्याच्या क्षेत्रफळाच्या कित्येक पटीने कमी आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात नव्याने पलूस कडेगांव या तालुक्याचे विभाजन झाले. उमदी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ६१ गावांचा समावेश आहे. मात्र शासनाकडून उमदी व उमदी परिसरातील लोकांच्या मागणीनुसार उमदी येथे स्वतंत्र तहसिल कार्यालय स्थापना करण्याऐवजी संख येथे अप्पर तहसिलदार कार्यालय स्थापन केले. वास्तविकता संख व उमदी या दोन परिसरातील लोक उमदी गावातील जागृत देवस्थान श्री वीर मलकारसिद्ध या देवाच्या पूर्वीपासून चालत आलेल्या रुढी परंपरेनुसार उमदी गाव वा परिसरातील लोक संख गावच्या हदीमध्ये कोणतीही वस्तु खरेदी करत नाहीत.
शिवाय त्या गावातील लोकांशी सोयरीक नातेसंबंध करत नाहीत. नियोजित उमदी या तालुक्याची नव्याने स्वतंत्र निर्मिती होण्यासाठी तालुक्यातील सुमारे ४० हून अधिक ग्रामपंचायतीचे ठरावही झालेले आहेत. वरील वस्तुस्थिती प्रमाणे जत तालुका व भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने व प्रचंड लोकसंख्या असल्याने जत तालुक्याचे जत, उमदी व संख असे त्रिभाजन होवून स्वतंत्र उमदी या तालुक्याची निर्मिती व्हावी याकरीता आपले स्तरावर योग्य ती लवकरात लवकर कार्यवाही व्हावी असेही निवेदनात म्हटले आहे.