तम्मणगौडा रवीपाटील यांचा विधानसभा प्रचारप्रमुख पदावरून हकालपट्टी करा

0
जत : भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख, माजी सभापती तम्मणगौडा रवी पाटील यांनी विधानसभेची उमेदवारी मलाच आहे असा प्रचार सुरू केला आहे. पक्षाचे काम करताना निष्ठावंतांना डावलून कामकाज सुरू आहे,तेव्हा तम्मणगौडा रवी पाटील यांची जत विधानसभा निवडणूक प्रमुखपदावरुन त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

विलासराव जगताप, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सेलचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, आप्पासाहेब नामद, चिदानंद चौगुले, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुनील पवार, चंद्रकांत गुडोडगी, माजी सभापती आकाराम मासाळ, सुशीला तावशी, मंगल जमदाडे, आनंदराव पाटील,भाजपचे शहर अध्यक्ष आण्णा भिसे, माजी पंचायत समिती सदस्य रामण्णा जिवणावर रवींद्र सावंत, दिग्विजय चव्हाण, माजी नगरसेवक मोहनभैय्या कुलकर्णी, प्रकाश माने, मिथुन भिसे, जयश्री मोटे, श्रीदेवी सगरे, गौतम ऐवळे या २२ जणांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन फडणवीस यांना देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, तम्मनगौडा रवी पाटील यांची सांगली लोकसभा निवडणुकीसाठी जत विधानसभा प्रचारप्रमुख निवड करताना कोणालाही विश्वासात घेतलेले नाही.ते भाजपचे सगळे कार्यक्रम माजी आमदार,तालुकाध्यक्ष किंवा पक्षाचे पदाधिकारी यांना विश्वासात न घेता स्वतःच करत आहेत.जत विधानसभेची उमेदवारी मलाच आहे असा प्रचार त्यांनी चालू केला आहे.

त्यामुळे भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या अशा अपप्रचारामुळे व वागणुकीमुळे पक्षाला धोका होणेची शक्यता निर्माण झाली आहे तरी त्यांची सांगली लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभेच्या प्रचारप्रमुख पदावरुन त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.