जत : उद्योगधंदे आणि शेतीसाठी सर्वात जास्त पाण्याचा वापर होतो. फक्त यासाठीच नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा दुष्काळग्रस्त भागांना अजूनही संघर्ष करावा लागतो, हि चिंतेची बाब आहे. जत सारख्या दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वेळोवेळी आग्रही भूमिका घेतलेली आहे आणि पुढेसुद्धा हा प्रयत्न राहील.
डफळापूर येथील चिदानंद माळी यांच्या शेताजवळील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे काम 4 वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे 11 गावांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला. याबद्दल येथील ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. त्यासाठी येथील ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार. खरंतर याचं समाधान वाटतं कि, यामुळे 11 गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला.
जत : डफळापूर येथील चिंदानंद माळी यांची तक्रार मिटल्यानंतर आ.विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.