दिलासादायक | जत तालुक्यात शनिवारी कोरोना दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक कमी रुग्णाची नोंद | एकाचा मृत्यू

0
5



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शनिवारी दुसऱ्या कोरोना लाटेतील सर्वात कमी नव्या कोरोना बाधित संख्येची नोंद झाली.शनिवारी करण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या तपासणीत 17 गावात फक्त 28 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र दुसरीकडे पुन्हा एका रुग्णाचा मुत्यू झाल्याने चिंता कायम असून मुत्यू दर कमी होत नसल्याचे चित्र आहे.






जत‌ 28,रामपूर 1,काराजनगी 1,डफळापूर 1,दरिकोणूर 2,राजोबाचीवाडी 1,उटगी 1,व्हसपेठ 1,जा.बोबलाद 3,करेवाडी को 1,बिळूर 1,सिंदूर 1,सिंगनहळ्ळी 1,धावडवाडी 3,हिवरे 2,बेवनूर 2,कोसारी 1 असे 28 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर 62 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे जतचा धोका काहीसा कमी झाल्याचे स्पष्ट आहे.सध्या 860 रुग्ण तालुक्यात उपचाराखाली आहेत.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here