सर्प दंशाने विवाहितेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना सिध्दनाथ(ता.जत) येथील शिंदे वस्ती येथे घडली आहे. सुनिता वसंत शिंदे (वय 30)असे विवाहित महिलेचे नाव आहे.शुक्रवारी पहाटे जत ग्रामीण रुग्णालयात विवाहितेचे निधन झाले.सिध्दनाथमधिल शिंदे वस्ती नजिक सुनिता शिंदे कुंटुबियासह राहतात.मध्यरात्री एक वाजता सुनिताला नागाने दंश केला होता.
त्यांना तातडीने पहाटे दोनच्या दरम्यान जत येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले.मात्र तोपर्यत विषाची मात्रेमुळे सुनिताचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर घोषित केले.सकाळी शवविच्छेदन करुन पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या पश्चात सासु सासरे व पती, दोन मुली असा परिवार आहे.
दरम्यान जत तालुक्यात गेल्या काही दिवसात विषारी सर्पाची संख्या वाढली आहे.त्यामुळे धोका वाढला आहे.शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.