धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारने भूमिका जाहीर करण्याची मागणी | जत येथे धनगर समाजाचे धरणे आंदोलन

0

घोषणांनी तहसील कार्यालय दणाणले

जत : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक घेऊन ठोस भूमिका जाहीर करण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी आंदोलनात बोलताना केली.महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे आश्वासन दिले होते पण त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याने महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये रोष आहे.जत तालुक्यातील धनगर समाज बांधव जत तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करून धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन ठोस भूमिका जाहीर करावी या मागणीकडे राज्य सरकारचे आणि विरोधी पक्षाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केलं असल्याचे ढोणे म्हणाले.

सरदार पाटील म्हणाले धनगर समाजाला सर्वच पक्षांनी फसविले आहे आता युवकांनी जागरूक होऊन आरक्षण चळवळ उभारली पाहिजे.शंकर वगरे म्हणाले पुढील काळात महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल.बंटी दुधाळ म्हणाले समाज्याच्या माथी फसव्या योजना मारल्या जात आहेत. समाजाला योजना नको हक्काचे आरक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले.

Rate Card

आमदार विक्रम सावंत यांनी आंदोलनास भेट देऊन येणाऱ्या अधिवेशनात धनगर समाजाचा तारांकीत प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मार्केट कमिटी संचालक बिरा शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य आकाराम मासाळ,दिलीप वाघमोडे, नाथा पाटील, माळी नगरसेवक निलेश बामणे, किसन टेंगले, सरपंच तुकाराम खांडेकर, रमेश देवर्षी,बाळासाहेब खांडेकर, योगेश एडके,रमेश कोळेकर, रवि पाटील, सागर शिनगारे, मुरलीधर शिंगे , पोपट पुकले,उत्तम म्हारनुर विलास काळे, पिंटू व्हणमाने,प्रकाश व्हणमाने,संतोष मोटे,शिवाजी पडोळकर, विलास काळे, तानाजी कटरे, समाधान वाघमोडे यासह तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.