सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने 21 मार्च 2022 रोजी काढलेल्या परिपत्रकात मुद्दा क्र 8 मध्ये प्रोत्साहन योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज न देण्याचे परिपत्रक काढले आहे हे परिपत्रक मागे घेण्यासाठी बँकेच्या दारात दररोज गांधीगिरी मार्गाने सुरू केलेलं साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करीत असल्याची माहिती युवा नेते नाथा पाटील आणि विक्रम ढोणे यांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारातील सहकारमहर्षी गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याला पुच्छहार घालून उपोषणाला सुरुवात करण्यात आली. आंदोलकांची भेट घेऊन बँकेचे संचालक विशाल पाटील आणि बँकेचे अधिकारी श्री काटे, श्री सावंत श्री माने यांनी चर्चा केली आणि परिपत्रकातील मुद्दा क्र. 8 हा शेतकरी सभादांच्या हक्कावर गदा आणणारा आहे ही बाब निदर्शनास आणून देत जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक असून शेतकऱ्यांची आर्थिक गैरसोय टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी दीर्घ /मध्यम मुदत कर्ज देण्याबाबत चर्चा झाली.
त्यानंतर विशाल पाटील यांनी सकारात्मक चर्चा करून येणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत याविषयी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत साखळी आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याचे श्री नाथा पाटील आणि विक्रम ढोणे यांनी सांगितले.आंदोलनामध्ये धनाजी शिंदे,किरण पाटील यादी सहभागी झाले होते.