घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांची परदेशवारी यशस्वी | दुबईत एप्पल व डेटा अनॅलिटिक्सचे घेतले प्रशिक्षण 

0
3
जयसिंगपूर: संजय घोडावत विद्यापीठ नेहमीच विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची संधी देत असते. येथील ग्लोबल एंगेजमेंट सेल च्या वतीने अलीकडेच विद्यापीठातील 19 विद्यार्थ्यांनी पाच दिवस दुबईला भेट दिली. ग्लोबल इमर्सन कार्यक्रमांतर्गत दुबईमधील तांत्रिक प्रगती,जागतिक व्यवसायातील आव्हाने या विषयाची माहिती घेतली.
या परदेशवारीत विद्यार्थ्यांनी दुबई येथील युकेच्या स्टर्लिंग युनिव्हर्सिटी मध्ये डाटा ऍनालिटिक्स विषयावर सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला. त्याचबरोबर विडम मल्टिनॅशनल कंपन्यांना विद्यार्थ्यांनी भेट दिली. यामध्ये एप्पल समावेश होता. या कंपनीतील तज्ञांनी एप्पल प्रोडक्शन सूटवर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतली.यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ झाली.विद्यार्थी आता डिजिटल जगामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना रियल स्टेट कंपनी डी ए एम ए सी ची व्यवसाय प्रक्रिया समजून घेण्याची अनोखी संधी मिळाली. येथे विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांचे प्रोजेक्ट पाहिले व अभ्यासले.
यासाठी विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले,कुलसचिव डॉ. विवेक कायंदे,अकॅडमीक डीन डॉ.व्ही. व्ही.कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. तर फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटच्या डीन डॉ.योगेश्वरी गिरी व ग्लोबल एंगेजमेंट अधिकारी अमृता हंडूर यांनी यासाठी कष्ट घेतले. दुबई साठी समन्वयक म्हणून प्रा.समीर कुरणे यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या या यशस्वीतेबद्दल अध्यक्ष संजय घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

संजय घोडावत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दुबई येथे विविध प्रकल्पांना भेट देऊन माहिती घेतली

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here