प्रत्येकाच्या जीवनात असफलता येते.त्यामुळे खचुन जाऊ नका. आयुष्य म्हणजे संघर्ष आणि तडजोड असुन आपल्याला स्वतः मधील वेगळेपण जपता आले पाहिजे.स्वता:मधील चांगले गुण व शक्ती ओळखा.चांगल्या कामासाठी नेहमीच पाठीवर शाबासकीची थाप मिळते.आज आयुष्यामध्ये पैशापेक्षा ज्ञानाला महत्व आहे.त्यामुळे ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते.
आपण या समाजाचे देणे लागतो.याची आठवण नेहमी ठेवा.नेहमी प्रामाणिकपणे काम करा.सत्याचा मार्ग कधीही सोडू नका.प्रत्येकामध्ये उपजतच गुण असतात.
त्या गुणांची जाणीव वेळच्या वेळी झाली पाहिजे.जी माणसं आयुष्यात यशस्वी होतात कारण त्यांनी आपल्यामध्ये वेगळेपण जपलेले असते.वेगळं काही तरी करून दाखवा .
या जगात जो झिजेल तोच चमकणार आहे.प्रत्येकाजवळ ज्ञानलालसा व विनम्रता हवी.एखादी गोष्ट हातात घेतली की ती पुर्णत्वास नेता आली पाहिजे.एखादं काम करायचं म्हटलं की त्याचं नियोजन करता आले पाहिजे.आपल्या विचारातून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं आपल्या स्वभावानुसार लोक आपल्या ओळखतात.त्यासाठी आपलं वेगळेपण जपले पाहिजे.
आपल्याला कणखर बनवता आले पाहिजे.सक्षम व्हा ,मन खंबीर बनवा ,सुर्यदयानंतर उठणार्याला यश नेहमी हुलकावणी देतं.हुशारीबरोबरच आपल्याला शहाणपणाचा व आपल्या ज्ञानाचा उपयोग करून घेता आला पाहिजे.आपले जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वता:मधील वेगळेपण जपता आले पाहिजे.
संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी ता.श्रीगोंदा , जिल्हा, अहमदनगर
महाराष्ट्र
मो.७७२१०४५८४५