वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळूनच माझ्या पतीने जीवन आयुष्य संपवलं | पत्नीचा गंभीर आरोप 

0
सोलापूर : माझ्या पतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.सोलापूर जिल्ह्यातील कुमठा नाका येथील सोसायटीत नांदेड पोलीस दलातील एपीआय आनंद मळाले यांनी कंटाळून आत्महत्या केली आहे.आनंद यांच्या पत्नी वंदना मळाले यांनी नांदेड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्रास दिला म्हणून माझ्या पतीने टोकाचं पाऊल उचलले आहे.आत्महत्या करण्यापूर्वी पती आनंद मळाले व्हॉटसअँपवर भावनिक मेसेज पाठवला होता.”चिमू, पिल्लू मला माफ करा.

 

 

मी तुमच्यासाठी योगदान दिले नाही. माझ्या पश्चात तुम्ही दोघे जीवाचे रान करुन चांगल्या भविष्यासाठी आटोकाट प्रयत्न करावेत.पिल्लूला माझे शुभ आशीर्वाद व त्याच्या उज्वल भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पँटच्या खिशात चिठ्ठी आहे”, असा मेसेज पत्नीला पाठवला होता. हा मेसेज सोशल मीडियावर येताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली.

 

 

रुग्णालयातच पत्नी वंदना मळाले ,मुलगा व सावत्र आईने हंबरडा फोडला होता. आनंद मळाले यांच्या मातोश्री रडून रडून बेशुद्ध पडल्या.सावत्र आई असतानाही त्यांनी सख्ख्या मुलाप्रमाणे आनंद यांचं संगोपन केलं होतं. जिवाचं रान करून पोराला मोठं केलं,खूप हुशार मुलगा होता,असा कसा सोडून गेला,तुला टेन्शन होत तर मला सांगायचं होत,अशा शब्दांत आईच रडणं पाहून त्यांचा टाहो पाहुन शासकीय रुग्णालयातील डॉक्टर,कर्मचाऱ्यांसह सर्वांचे डोळे पाणावले.

 

Rate Card
माझ्या पतीला वरिष्ठांकडून खूप त्रास दिला जात होता. गुन्ह्याच्या तपासाकामी वरिष्ठ पोलीस अधिकारी दबाव आणत होते,असा गंभीर आरोप मृत एपीआयच्या पत्नीने केला आहे. त्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.