पीक विमा भरपाई बाबत चांगली बातमी,कृषिमंत्री म्हणाले…

0
4
पीक विम्यासंदर्भात दिलासादायक बातमी आहे.राज्यात पावसाचा २१ दिवसांचा पडलेला खंड व ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या अधिसूचित मंडलातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देण्याचा प्रयत्न असल्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

 

नुकतीच पीक विम्यासंदर्भातील अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांनी नुकतीच बैठक घेतली. विमा कंपन्यांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे.मुंडे म्हणाले, की कांदा व टोमॅटोच्या भावावरून शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना नाशिकमध्ये काळे झेंडे दाखवले होते.मंत्री मुंडे यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला.

 

 

ते म्हणाले, की जेव्हा शेतकऱ्यांना ऐतिहासिक २७१० रुपये भाव दिला गेला, त्या वेळेस माध्यमांना ती बातमी करावीशी वाटली नाही. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व मी अशा तिघांनी बैठक घेतली. आणखी दोन लाख टन कांदा विकत घेण्याचा निर्णय घेतला. या कांद्याला २१५० रुपये भाव देऊन तो विकत घेणार आहोत. हा ऐतिहासिक निर्णय आहे,असाही दावा मुंडे यांनी केला.”
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here