जत : जत तालुका कायम दुष्काळी असून आवर्षण प्रवर्ग आहे. या वर्षी सप्टेंबर अखेर सरासरी ८० मीमी ते १०० मीमी इतकाच पाऊस झाला आहे. सर्व तलाव कोरडे ठणठणीत आहेत खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेला आहे. द्राक्ष, डाळींब व ऊस ही नगदी पिके पाण्याअभावी वाळून गेली आहते तसेच पाणी व चाऱ्याअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे.
दुष्काळ जाहीर करा म्हणून सर्व पक्षांनी रास्ता रोको, उपोषण इत्यादी आंदोलन करून ही आजतागायत दुष्काळ जाहीर केला नाही हे दुर्देव म्हणावे लागेल. सध्या तालुक्यात २५ गावे व २१९ वाड्यावस्त्यावरती २९ टैंकर व्दारे पिण्याच्या पाण्याचे सोय करणेत आलेले आहे. खरीपाच्या ५४ गावांची पिक पाहणी आणेवारी ५० पैसेच्या आत आहे,त्यामुळे जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी केली आहे.
जत तालुक्यात तीव्र दुष्काळ असून दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ च्या पुढारी दैनिकामध्ये दुष्काळजन्य स्थितीमध्ये जत तालुक्याचे नाव नाही हे अतिषय खेदाची बाब आहे. राज्यातील ४२ तालुक्याच्या दुष्काळजन्य स्थितीचा अहवाल शासनास १७ ऑक्टोबर २०२३ देणेचे आहे. या यादी मध्ये जत तालक्याचे नाव नाही तरी सध्यस्थिती पाहता दुष्काळ जत तालुका दुष्काळ जाहीर करून जनतेला दिलासा देणे गरजेचे आहे,प्रशासनाने गंभीर व्हावे,असा इशारा जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिला आहे.