जत तालुक्यात प्रथमचं मॅटवरील कबड्डी स्पर्धा | ३५ संघाचा सहभाग

0
9
जत : माडग्याळ ता.जत येथील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ यांच्यावतीने बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर स्पर्धांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तर यामधील मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन ही ग्रामीण भागातील आकर्षक स्पर्धा ठरत आहे.
दरम्यान मॅटवरील कबड्डी स्पर्धेसाठी जत तालुक्यातील विविध गावातील संघाने सहभाग घेतला. तसेच कर्नाटक राज्यातील विजापूर अथणी बेळगांव यास आदी जिल्ह्यातील संघ सहभाग घेतला आहे.तर महाराष्ट्रातील बारामती, अकलूज, नातेपुते, सांगली, मिरज, कुपवाड, कवठेमंकाळ, यासह आदी भागातील 35 हून अधिक संघ या स्पर्धेत सहभाग नोंदविले.

 

तर या स्पर्धेचे आज उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते झाले. तर या स्पर्धेत आणि संघाने चुरशीने लढत देऊन ही मॅटवरील कुस्ती स्पर्धा पार पडली मॅटवरील कुस्ती स्पर्धा ही या भागात प्रथमच पहिल्यांदाच असल्याने भरगळ तसा प्रेक्षक वर्गाने प्रतिसाद दिला तर कबड्डी रात्री दोन वाजेपर्यंत हा खेळ सुरू होते.

 

यात विविध प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघास आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडून 21 हजार रुपयांचे बक्षीस तर द्वितीय क्रमांक येणाऱ्या संघास बाजार समितीचे समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्याकडून 15000 रुपयाचे बक्षीस तर तृतीय क्रंमाक मिळवणाऱ्या संघास 11 हजार रुपयांचे बक्षीस तर चौथे क्रमांक मिळवणाऱ्या संघास सुनील घाटगे यांच्याकडून पाच हजाराचे बक्षीस हे विजेत्या देण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे.तर यावेळी त्यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, सांगली बाजार समितीचे संचालक बाबासाहेब माळी,माजी नगरसेवक निलेश बामणे आदि मान्यवर उपस्थित होते.
याबरोबर सार्वजनिक उत्सव मंडळाकडून यांच्याकडून प्रत्येक वर्षी वेगवेगळी उपक्रम राबवले जातात यामध्ये कन्नड भाषेतून नाटक तसेच हॉलीबॉल स्पर्धा, सामाजिक कार्य तसेच यासाठी मंडळाला अप्पू कोळगिरी, प्रकाश भोसले, रविशंकर बुद्धाळ, बाळासाहेब कोरे,डॉ.रोहित सावंत, डॉ.प्रकाश सावंत,पप्पू माळी, बाळू ऐवळे, टिमया एळल्गार ,विजय हाके यांच्यासह आदींचे आर्थिक सहकार्य मंडळास लाभले आहे. यावेळी मंडळाचे प्रदीप करगणीकर, एम. एस.माळी सर , सुखदेव माळी,व्हन्नाप्पा माळी,काशिनाथ  माळी,नागप्पा कोरे,माजी सरपंच आप्पासाहेब जत्ती, बाळू कोरे,निंगाप्पा कोरे,कामू  चौगुले, सिद्धाण्णा ऐवळे,संतोष बोगार,याच्यासह आदी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here