जास्तीत जास्त जनसेवा करा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देशपातळीवर आपल्या ३२ विविध सेल व विभागाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय आहे. त्याप्रमाणे राज्यातही राहिलेल्या सर्व सेल, फ्रंटल व मंडल समित्यांच्या कार्यकारिणीच्या निवडी १ नोव्हेंबर २०२३ पर्यंत कराव्यात असा आदेश प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी पुणे बैठकीत दिले आहेत. त्याप्रमाणे दि.१ नोव्हेंबर पर्यंत राहिलेल्या कांही सेल व बुथ कमिट्यांच्या कार्यकारिणीच्या निवडी करुन शहर काँग्रेस कमिटीकडे सादर करा.. जनतेत मिसळा.. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आंदोलन करुन आवाज उठवा
शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून काँग्रेस पक्षाची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी कटीबध्द व्हा.. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले. सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे विविध सेल, मंडल समित्या व बुथ कमिट्यांच्या पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे संघटक सरचिटणीस आशिष कोरी यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना बैठकीचे प्रयोजन सांगितले.
पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले,दि.८ ऑक्टोबर २०२३ रोजी पुणे येथे प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी बैठक घेतली त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा उपस्थित होते. त्या बैठकीत सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा सविस्तर दि.१ एप्रिल ते सप्टेंबर २०२३ अखेरचा अहवाल सादर केला
आहे. त्या बैठकीत राज्यातील काँग्रेस पक्षाच्या ३२ सेल, फ्रंटल व बुथ कमिट्यांच्या कार्यकारिणी रचना पूर्ण करण्याची सूचना आमदार नानाभाऊ पटोले यांनी केली.
पुणे बैठकीत ठरल्याप्रमाणे सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व सेल, फ्रंटल व बुथ कमिट्यांच्या कार्यकारिणी रचना पूर्ण करण्यासाठी १ नोव्हेंबर २०२३ ही शेवटची तारीख असेल. विविध २० समित्या पदाधिकारी व कार्यकारिणी निवडी झाल्या आहेत. अद्याप काही होणे बाकी आहेत त्या लवकरच पूर्ण करणे आवश्यक आहे.
पक्षाची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी सर्वांनी कंबर कसली पाहिजे. काम करायला इच्छुकांची नावे घ्या. माझ्याकडे नावे आली तर ती सांगतो.
मीही प्रारंभी कार्यकर्ता म्हणून वैद्यकीय सेलचे काम केले आहे. कामाची व्याप्ती मोठी आहे. कार्यकर्ता म्हणून काम करत रहा हा माझ्या वडिलांनी मला धडा दिला आहे
पदामुळे कार्यकर्त्यांना समाजात ओळख मिळते.पण केवळ लेटरहेड व व्हिजिटींग कार्ड एवढेच पुरेसे नाही.
जनतेत जा.. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी अखंड धडपडणारा कार्यकर्ता बना.. मोर्चा.. धरणे.. उपोषण आणि आंदोलनाच्या कामातून कामे करुन आपली ओळख बनवा.प्रामाणिकपणे काम करत संधीचे सोने करा. अडचण आली तर आम्ही आहोतच.
पद चालवता आले पाहिजे.राहिलेल्या सेलच्या कार्यकारीणी साठी जनसंपर्क करुन नावे घ्या. काम करणाऱ्या लोकांचा सहभाग घेण्यासाठी तुम्हाला अधिकार दिले आहेत.दि.१ नोव्हेंबर २०२३पर्यंत सर्व सेल व बुथ कमिट्यांच्या कार्यकारिणी पूर्ण झाल्या पाहिजेत. यासाठी महापालिका क्षेत्रात समन्वयक म्हणून आशिष कोरी यांनी जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या संपर्कात रहा.८ नोव्हेंबर रोजी प्रदेश काँग्रेस कमिटीला सर्व सेल फ्रंटल व मंडल कमिट्यांचे पदाधिकारी व कार्यकारिणी निवड यादी सादर करण्यात येणार आहे त्यामुळे कामाचा वेग वाढवा.जास्तीत जास्त जनसेवा करा.”
या बैठकीत शिक्षक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. एन.डी.बिरनाळे, सेवा दलाचे अजित ढोले, ओबीसीचे अशोकसिंग रजपूत, अमित बस्तवडे, निराधार व निराश्रितच्या प्रतिक्षा काळे, प्रशांत कांबळे, प्रशांत देशमुख, एस टी इंटकचे बनसोडे, डॉ. नितीन पाटील, राजेंद्र कांबळे, कुपवाड काँग्रेसचे सनी धोतरे, नंदा कोलप, आशिष चौधरी, अमोल पाटील, सिध्दार्थ कुदळे, मनोज पवार, रामकृष्ण जाधव, अजय देशमुख, बिपीन कदम मारुती देवकर, कांचन खंदारे, उर्मिला कदम, मौलाली वंटमुरे, संजय मोरे, इलाई बारुदवाले, अल्ताफ पेंढारी,वहिदा नायकवडी, विश्वास यादव व शहर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.