खेळ पैठणीचा कार्यक्रमात महिलांची धम्माल | तम्मनगौडा रवीपाटील फौंडेशनचा उपक्रम

0
7
जत : तम्मनगौडा रवीपाटील युथ फाउंडेशनच्यावतीने “खेळ पैठणीचा”  कार्यक्रमात महिला भगिनींनी धम्माल केली. कार्यक्रमास 3000 हून अधिक महिलांनी उपस्थिती दर्शविली. पैठणी, फ्रीज, कूलर, साड्या, रोख बक्षीसांची खैरात करण्यात आली.

सिनेअभिनेते क्रांती नाना माळेगांवकर यांनी तूफान कार्यक्रम सादर केला.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जत डफळे परिवारातील श्रीमंत ज्योत्सनाराजे डफळे, सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी सौ. ज्योतीकाकी पाटील, सौ. अलकाताई सुरेशराव शिंदे, उद्योजिका सौ. विजया चिपलकट्टी, बालरोगतज्ञ डॉ. सरिता पट्टनशेट्टी, डॉ. विद्या नाईक, डॉ. ममता तेली, माजी नगरसेविका श्रीदेवी सगरे, माजी नगरसेविका सौ.  शारदाताई कुंभार, भाजप महिला आघाडी प्रमुख तेजस्विनी व्हनमाने, सौ. विजयालक्ष्मी बिराजदार, सौ. सुरेखा वैभव लोणी, काराजनगीच्या सरपंच संगीता लेंगरे, सुनिता मालाणी उपस्थित होते.

 

भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील, उद्योजक विजयकुमार चिपलकट्टी, माजी नगरसेवक टीमूभाई एडके यांच्या शुभहस्ते जत ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला ‌ उमदी येथे विषबाधा झालेल्या विद्यार्थांवर यशस्वी उपचार केल्याबद्दल शाल, साडी, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमाचा जत नगरीमधील महिलासह लहान मुलांनीही मनमुराद आनंद लुटला. विजेत्या महिलांना तम्मनगौडा रवीपाटील युथ फाउंडेशन यांच्यावतीने सौ. सावित्रीताई तम्मनगौडा रवीपाटील व सौ. विजयालक्ष्मी महादेव बिरादार यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले. प्रथम बक्षीस फ्रीज व पैठणी, द्वितिय बक्षीस कुलर व पैठणी, तृतीय बक्षीस फॅन व पैठणी तसेच २०० हून अधीक साड्यांचे वाटप करण्यात आले. जतमधील सर्व महिलांनी जत विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख तम्मनगौडा रविपाटील यांचे आभार मानले. तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here