जत तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होणार,’या’ नेत्याने दिली माहिती

0
7

जत:जत तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश होण्यासाठी येत्या कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव मंजूर होणार आहे. भाजप जत तालुक्याला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य तम्मनगौडा रवीपाटील यांनी पत्रकार दिली.

 

रवी पाटील म्हणाले, जत तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीमधून वगळण्यात आले आहे. यादीमधून तालुक्याला का वगळण्यात आले! याची काही कारणे समोर आली आहेत. मात्र जत तालुक्याचे लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडत आहेत. त्यामुळेच तालुक्यावर सातत्याने अन्याय झाला आहे. जत तालुक्याला निष्क्रिय आमदार मिळाले हे दुर्दैव म्हणावे लागेल.
जत तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करावे यासाठी भाजपच्या कोअर कमिटीमध्ये ठराव करण्यात आला आहे. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, संपर्कप्रमुख सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी तातडीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून जत तालुक्यावर अन्याय होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

बावनकुळे यांनी सदरचा विषय तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवून येत्या कॅबिनेट बैठकीत जतचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.जतचे आमदार विक्रम सावंत हे तुबची बबलेश्वर योजनेवरून अनेक वर्षांपासून जत तालुक्याची दिशाभूल करीत आहेत. तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी मिळाले तर आम्हाला आनंदच आहे, परंतु आमदारांनी पूर्व भागातील जनतेच्या भावनांशी खेळु नये, अशी टीका रवीपाटील यांनी केली.
खासदार संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत जत तालुक्यातील विविध गावच्या पाणीप्रश्नासंदर्भात भाजप वाॅररूममध्ये बैठक घेण्यात आली.

 

ज्या ज्या ठिकाणी पाणी पोहोचले नाही किंवा थोडे काम केल्यानंतर पाणी पोहचू शकते अशा सर्व कामांचे सर्वेक्षण तातडीने करून अहवाल सादरचे आदेश खासदाराने अधिकाऱ्यांना दिले, असेही तम्मनगौडा रवीपाटील यांनी सांगितले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here