‘दोघाचे दुखणं एकच’,मनोज जरांगे पाटील यांचा धनगर आरक्षणालाही पाठिंबा

0
5
आरक्षणाचा मराठा समाज आक्रमक झालेला असताना धनगर समाजही आरक्षणासाठी आंदोलनाच्या पविञ्यात आहे.मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला दिलेल्या अल्टिमेटम आज संपला आहे.शेवटच्या दिवशी त्यांनी आरक्षणासाठी धनगर समाजालाही पेटून उठण्याचं आवाहन केलं आहे.मी धनगर आरक्षणासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करेन असे आश्वासनही त्यांनी दिलं.चौंडी येथील धनगर मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी आश्वासन दिले आहे.

 

जरांगे पाटील म्हणाले आहेत की,मराठा समाजही उस तोडायचा.रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जायचा.आमच्या वाट्याला जे कष्ट आले ते मुलांच्या वाट्याला येऊ नयेत. म्हणून आरक्षण पाहिजे. आपल्या दोघांचं (मराठा-धनगर)समाजाच दुखणं एकच आहे. “डोंगरात, दरीत, पाण्यात, पावसात तुम्ही मेंढरं चारता.

तुमचं व आमचं स्वप्न एकच आहे की,माझ्या वाट्याला कष्ट आले ते माझ्या लेकराच्या वाट्याला नकोत.पण कोणाचंच स्वप्न पूर्ण होत नाही.आरक्षणापायी स्वप्न भंग होतात. रात्रंदिवस कमावलेला पैसा वाया जातो.त्यामुळे आरक्षणाशिवाय पर्याय नाही.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here