जत तालुक्यात पूर्व भागात दुष्काळी परिस्थितीचे सावट गडद होत आहे. यावर उपाय योजनेसाठी खासदार संजयकाका पाटील यांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीस आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपाचे नेते तम्मणगौडा रवीपाटील, उद्योजक विजयकुमार चीपलकट्टी आणि इतर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत दुष्काळ प्रश्नावर सखोल चर्चा होऊन, योग्य उपाययोजना सुचविण्यात आल्या. लवकरच या समस्येवर तोडगा काढण्यात येईल,असे आश्वासन खा.पाटील यांनी दिले आहे.