दुःखातही मानव उत्तम जीवन जगतो

0
6
जगात जन्माला आला आहे त्याला दुःख हे आहेच कारण निसर्गाचा नियमच आहे की दुःख सहन केल्याशिवाय सुखाचा मार्ग सापडत नाही. म्हणजेच प्रत्येक जिवीताच्या वाट्याला दुःख हे पाचविलाच पुजलेले असते. पण कुणीही ते दुःख आल्यामुळे छाती बडवत वसत नाही. परंतु या दुःखामध्ये सुखही दडलेले असते. तसही कोणत्याही चांगल्या किवा वाईट घटनेनंतर वाईट किंवा चांगली घटना घडणारच असते. हा निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे कोणताही जिवीत प्राणी खंबीरपणे जगत असतो.
 
         
जन्मजात आलेले दुःख
जन्मजात आलेल्या दुःखात २५ टक्के दुःख हे बाहेरुन आलेले आसते. म्हणजेच आपण बाहेर फिरताना, व्यवसाय करताना, शिक्षण घेताना, नोकरी करताना, परगावी किवा फिरतीवर असताना जो त्रास होतो तेच तर दुःख हे या २५ टक्क्यातील आहे. कामात किंवा व्यवसायात आलेल्या अडचणी हे व्यावसायिक दुःख. कोणत्याही बाहेरील कारणास्तव झालेला मनस्थाप हे या दुःखात समाविष्ठ होते. जसे बाहेरील व्यवहार आपण हाताळतो तसा तसा त्या दुःखात फरक पडत जीती किवा वाढ होत जाते. तशातच चोऱ्या माऱ्या, युध्द, महागाई, दुष्काळ आणि दारीद्र या मुळे वरील २५ टक्के दुःख मामसांच्या आयुष्यात येते आणि एकच गोंधळ उडवून देते. त्यामुळे माणसाला काहीच समजत नाही.
 
     
आपण निर्माण केलेले दुःख 
जीवनात संसाररूपी जगात वावरत असताना माणसाच्या हातून अनेक वाईट चालिरीतींचे आचरण केले जाते . आणि त्यातून निर्माण होणारा त्रास, वेदना आणि परमेश्वराने दिलेले जिवन आपण उपभोगत आहोत. या उपभागी जीवनातून आपल्या आयुष्यात ७५ टक्के दुःख आपण निर्माण केले जाते. ते संपवता संपवता जी वेळ जातो त्यालाच जीवन असे संबोधले जाते. मन आणि हृदय यांचे एकत्रीकरण करुन त्याला भगवंताने मूर्तरूप देऊन आपणाला या जगात साकार केलेले आहे. भगवंत आनंदरुपात असल्यामुळे तो दुःख निर्माण करीत नाही. नेहमी आनंदरुपातच असतो. मात्र जन्माला घालताना प्रत्येकाचे प्राक्तन त्याने लिहिलेले असते त्या प्रमाणेच त्याचा जीवनरुपी रथ संसारात फिरत असतो. त्यातील दोन चाके ही मुख – दुःखाची असतात. त्यांना समतोल ठेवण्याचा प्रयत्न म्हणजेच संसार आणि जीवन. ह्या जीवनाच्या चक्रयूहातून मुख्त होण्यासाठी आपल्या मनासारखे व्हावे असे म्हणणे म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्ठी आहेत त्या कधीही बदलल्या जात नाहीत. आणि आपल्याला आनंद कधीच मिळत नाही. तो आनंद मिळण्यासाठी देवावर निष्ठा ठेवावी. मी माझे कर्तव्य करीत राहीन ते करीत असताना मी अनिती, अधर्माने वागणार नाही. जे व्हायचे ते होऊदे मी काळजी करीत बसणार नाही. ही वृती ठेऊन जगात जी वावरतो ना तोच मानव सुखी होईल. कारण या देहाचा लगाम भगवंताच्या हाता आहे. तो जसे वागवेल तसे वागणे आपले कर्तव्य आहे.
                                         
दत्ताराम दळवी
लालबाग
9820527855
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here