जत तालुक्यात दुष्काळ जाहीर | दुष्काळसदृश सवलती मिळणार

0

 

जत: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील १०२१ महसुली मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. त्याचा संपूर्ण जत तालुक्यास लाभ होणार असल्याची माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी दिली.
तम्मनगौडा रविपाटील म्हणाले की, जत तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पहिल्या यादीत जतचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश नव्हता. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री यांचे सचीव अमोल पाटणकर यांच्याकडे आपण पाठपुरावा केला होता. प्रशासनाने सविस्तर अहवाल सादर केला होता.

 

जत तालुक्याला दुष्काळग्रस्त सवलती मिळणार आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सुट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषि पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती लागू करण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती तम्मनगौडा रवीपाटील यांनी पत्रकारांना दिली.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.