जतकरांना थंडीत गरमीचा अनुभव; हलक्या पावसाची शक्यता

0
15

जत : जत शहरामध्ये बुधवारी सकाळी किमान तापमानात वाढ होईल, ढगाळ वातावरण तयार होईल. त्यानंतर गुरूवार पासून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.पुढील दोन दिवस पावस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.संध्याकाळी ते पहाटेपर्यत काही काळ थंडीत वाढ होताना दिसत आहे.मात्र ढगाळ वातावरणामुळे अपेक्षित थंडी नाही.

राज्यभरात किमान तापमानात वाढ झाली आहे.त्यामुळे दुपारी उष्णता जाणवत आहे.दुपारी खूप गरम होत होते. थंडीमध्ये अशा प्रकारचे हवामान नवीनच आहे. दिवाळीत केवळ दोन दिवस थंडी पडली आणि त्यानंतर किमान तापमानात वाढ झाली. सध्या किमान तापमान १६ ते २० च्या दरम्यान नोंदवले जात आहे.

राज्यात दोन दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. हवेतील गारठा कमी झालेला दिसून येत आहे. राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here