कारागृहातून पळालेला बंदी पोलिसांच्या ताब्यात,मिसाळवाडीत कारवाई

0
सांगली : दिवाळीच्या धामधुमीत सांगली जिल्हा कारागृहातून भिंतीवरून उडी मारून पळालेल्या न्यायालयीन बंदीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.सदाशिव अशोक सनदे (वय २५, रा. मिसळवाडी, आष्टा) असे बंदीचे नाव आहे. सोमवार,दि.६ रोजी तो कारागृहातून पसार झाला होता.मिसाळवाडीत घराजवळूनच त्याला जेरबद केले आहे.
बाल लैगिंक,अत्याचार प्रकरणात सदाशिव सनदे हा न्यायालयीन बंदी असलेला कारागृहातील स्वयंपाक खोलीमध्ये गेला होता. या ठिकाणी कोणीही नसल्याची संधी साधत भिंतीवरून उडी मारून पटवर्धन हायस्कूलजवळून तो पसार झाला होता.सोमवारी दुपारच्या दरम्यान ही घटना घडली होती.सनदे यांच्यावर आष्टा पोलिसांत त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आहे.
Rate Card
सनदेच्या शोधार्थ एक पथक कार्यरत होते. पथकाला माहिती मिळाली बंदी सनदे हा त्याच्या घरी मिसळवाडी येथे आला आहे. त्यानुसार पथकाने त्याच्या घराजवळ सापळा लावला.पोलिसांना तो आढळून येताच त्यास ताब्यात घेतले.स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, अरुण पाटील, सुनील जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.