जालीहाळ खुर्द येथील युवकाचे अपहरण,पोलीसात तिघाविरोधात गुन्हा दाखल

0
6

जत : जत तालुक्यातील जालिहाळ खुर्द येथील एका युवकाचे अपहरण केल्याची तक्रार उमदी पोलीसात ‌दाखल झाली आहे. शत्रुघ्न धर्मा तांबे (वय २५) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे.त्यांची पत्नी सारंगा शत्रुघ्न तांबे यांनी उमदी पोलिसांत तिघाविरुद्ध अपहरणाची फिर्याद दिली आहे.ही घटना सोमवारी (दि. २०) सकाळी नऊ वाजता सुमारास ही घटना घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत अधिक

 

माहिती अशी की, शत्रुघ्न तांबे हे जालिहाळ खुर्द येथील घरी होते. दरम्यान संशयित केतन सावंत, शरद मोरे, खोडे परीष यांनी शत्रुघ्न याला दमदाटी करुन चारचाकीतून नेले. या घटनेनंतर तांबे या तरुणाचा संपर्क होऊ शकला नाही. तांबे याची पत्नी सारंगा तांबे यांनी याबाबत उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी केतन सावंत, शरद मोरे, खोडे परिष (सर्व रा. अमरापुर ता. कडेगाव) यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here