कोयना धरणाचा सातबारा शंभूराज देसाईंच्या नावावर नाही ? ; सांगलीचे खासदार आक्रमक

0
13

सांगली जिल्ह्यास कोयना धरणातून पाणी मिळावे याविषयासंबंधी पत्रकार परिषद घेतली
दरम्यान सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने कृष्णा नदी दुसऱ्यांदा कोरडी पडली आहे.

 

सांगलीत कोयनेच्या पाणी प्रश्नावरून कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत काही ठराव करण्यात आले. त्या ठरावावर सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी सही केली. मात्र, साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी आडमुठी भूमिका घेत त्यावर सही केली नाही,त्यामुळे आक्रमक झालेले सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी कोयना धरणाचा सातबारा शंभूराज देसाईंच्या नावावर नाही ?,आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्यावे‌ लागेल,असा इशारा दिला आहे. प्रंसगी खासदारकी पणाला लावू असेही खा.पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

 

सांगली जिल्ह्याला वेठीस धरण्याची भूमिका घेऊन राजकारण होत असेल तर प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याबाबत स्पष्ट केले तसेच आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागत आहोत आम्ही भीक मागत नाही. साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी आडमुठी भूमिका घेतली याचा आम्ही निषेध करत आहोत.याची तक्रार आम्ही केंद्रीय गृहमंत्री मा.अमितजी शाह,उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. घाणेरडे राजकारण आम्ही खपवून घेणार नाही,असा इशारा यावेळी दिला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here