श्रीपती शुगरतर्फे ऊस वाहतूकदार यांना रिफ्लेक्टर वाटप

0
21
डफळापूर : श्रीपती शुगर अँण्ड पॉवर लि डफळापूर येथे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर चे वाटप कारखाना साईट वरती करणेत आले. प्रादेशिक परिवहन विभागाचे सुचनेनुसार रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनाचे पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर असणे अत्यंत आवश्यक असून अपघात टाळणे करिता श्रीपती शुगर मार्फत सर्व ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर देऊन वाहनधारकामध्ये त्याची जनजागृती करून रिफ्लेक्टरचे महत्व वाहन धारकांना सांगण्यात आले. यावेळी श्रीपती शुगरचे जनरल मॅनेजर श्री महेश जोशी, शेती अधिकारी हनमंत धारीगोडा, सुरक्षा अधिकारी श्री चमनशेख ,सर्व अधिकारी, कर्मचारी व वाहन चालक उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here