म्हैसाळच्या पाण्याने जतचे चित्र बदलतयं

0
4
जत : जत तालुक्यासाठी वरदान ठरणारी म्हैसाळ योजना ही 1984 साली वसंतदादांनी या योजनेची सुरुवात केली होती.जेव्हा आपल्या गावातून या योजनेचा सर्वे चालू होता तेव्हा लोक त्यांना वेड्यात काढायचे पण सरकार ने ठरवलं तर सगळं शक्य होऊ शकते हेही तितकंच सत्य आहे.नेहमी दुष्काळी तालुका म्हणून आपल्या जत तालुक्याला हिणवलं जायचं पण 1984 पासून वेगवेगळ्या पक्षाचे आमदार, खासदार आणि सर्व पक्षांचे नेते व सरकारने केलेल्या अथक प्रयत्नामुळे आज ही म्हैसाळ योजना पूर्णत्वास येत असताना दिसत आहे.पाण्याने भरून वाहणारे कँनॉल,परिसरातील हिरवाई रूपड पालटणारे ठरत आहे.

 

 

सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भौगोलिक क्षेत्र असलेला आपला जत तालुका आहे आणि आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांमध्ये एक जबरदस्त पोटॅन्शिअल आहे पण पाण्याअभावी ते पूर्ण होऊ शकत नव्हते. पण हे म्हैसाळ योजनेचे पाणी आपल्या गावामधून जात आहे ती एक आपल्या गावासाठी पर्वणी ठरत आहे.आणि त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल कारण आज आपल्या अनेक छोट्या- छोट्या गावातून दररोज दहा-दहा हजार लिटर दूध उत्पादन होत आहे आणि दुग्ध व्यवसाय हा प्रामुख्याने मुख्य व्यवसाय म्हणून नावारूपास येत आहे.

 

पूर्वी ज्वारी आणि बाजरी उत्पादन घेणारा शेतकरी ऊस,डाळिंब,द्राक्ष या सारख्या नगदी पिकांकडे वळला आहे. इथून पुढे ही योजना कशी सक्षमपणे चालेल यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी वापर संस्था स्थापन करून योजना सक्षमपणे चालवण्यास हातभार लावला पाहिजे.येणाऱ्या काळात आपले गांव, तालुक्यामधील सर्व गावे आणि आपला तालुका सुद्धा जिल्ह्यामध्ये अग्रेसर असेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here