नर्सिंग प्रशिक्षण पुर्ण केलेल्या तरूणाची गळपासाने आत्महत्या

0

संख : संख(ता.जत) येथील महेश ईरगोंडा जिगजेणी (वय २३) या तरुणाने आपल्या राहत्या‌ घरात गळफास लावून आत्महत्या केली. घरातील सर्वजण लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.महेशने सकाळीच गळपास घेतला असण्याची शक्यता व्यक्त होत होती.

Rate Card

 

कर्नाटकातील विजयपुर येथे महेशने बी.एस.सी. नर्सिंग प्रशिक्षण पुर्ण केले आहे.गेल्या वर्षापासून तो गावीच आहे. महेश अन् आई दोघेच संख येते राहत होते. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते समोरच भाड्याने राहत होते. घराचे काम पूर्ण झाल्यानंतर महेश नोकरीसाठी बाहेर पडणार होता.

 

मंगळवारी सकाळी त्याची आई नातेवाईकाच्या लग्नाच्या निमित्ताने बाहेर गेली होती. सायंकाळी घरी येता दरवाजा उघडला असता महेश यांने गळफास घेत आत्महत्या केली होती. घटनेची माहिती उमदी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली.गेल्या आठवड्यापासून तो अत्यंत नैराश्यतेमध्ये होता असं नातेवाईकाकडून सांगण्यात आले. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.