सांगली : क्रांतीकारी वृत्तपत्र एंजन्ट व विक्रेते संघटनेच्या मेळाव्यात वृत्तपत्र विक्रेते व एंजन्टांच्या मागण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा एकमताने ठराव घेण्यात आला.यावेळी बिलावर ३० टक्के कमिशन,डिपॉजिट रक्कमेला व्याज,पुरवणीसाठी जादा कमिशन अशा मुद्यावर यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
क्रांतिकारी वृत्तपत्र एंजन्ट व विक्रेते संघटनेचा मेळावा वृत्तपत्र एंजन्टांचे पितामाह तथा अध्यक्ष हंणमतराव निकम यांच्या अध्यक्षतेखाली आष्टा येथील जायन्टस् ग्रुप हॉलमध्ये मेळावा संपन्न झाला.यावेळी यंशवत कदम पलूस,अनिल कुंभार बागणी,अनिल नांगरे शिराळा,सोहम विनय भंडारे विटा-खानापूर,धंनजय बोधे कडेगाव,अजित माने तासगाव,राजू माळी जत,अनिल नांगरे शिराळा,स्वप्निल प्रमोद कुलकर्णी इस्लामपूर,बालम हमीद जमादार पेठ,फारूक ढगे पेठनाका,जगदीश बाबर कामेरी,सौ.सुषमा अनिल कुंभार,सौ.शालन बापू करळमाळकर चिकुर्डे,सौ.आंनदी वसंत बावडे बाहदुरवाडी या प्रमुख एंजन्टासह शंभरावर एंजन्ट व विक्रेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना हणमंतराव निकम म्हणाले,राज्यभरात सांगलीतील एकमेव क्रांतीकारी वृत्तपत्र एंजन्ट व विक्रेता संघटना क्रांतीकारी आंदोलन उभारून न्याय मिळवला आहे.कोरोना नंतरच्या काळात वृत्तपत्र एंजन्ट व विक्रेत्यांची अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.ऊन,वारा,पाऊसातही पहाटेच्या वेळेला घरोघरी वृत्तपत्र पोहचविणारे व विविध वृत्तपत्रांना भरभराटी आणणारा हा घटक आज जगण्याची लढाई लेता आहे.आता त्यांना आधाराची गरज आहे.त्यामुळे सर्व दैनिकांनी सरसकट एंजन्टांना ३० टक्के कमिशन द्यावे,डिपॉजिट रक्कम एकतर दोनबिलाऐवढी परत द्यावी, उरलेल़्या डिपॉजिट रक्कमेला व्याज द्यावे,त्याचबरोबर शहराप्रमाणे पुरवणी भरववळ म्हणून २० पैसे वाढिव कमिशन द्यावे आदी मुद्यासह एंजन्ट व विक्रेत्यांच्या अन्य प्रश्नासाठी गेल्या महिन्यात सर्व दैनिकांना मागण्याचे निवेदने दिले आहेत.मात्र मुर्दाड व्यवस्थापन आम्हाची दखल घेत नाही.त्यामुळे आम्हाला हा लढा आक्रमक करण्याशिवाय पर्याय नाही .
निकम म्हणाले,आम्ही आमच्या हक्काच्या मागण्या सर्व दैनिकांकडे करत आहोत.एंजन्ट व विकेता हा घटक वृत्तमान पत्राचा महत्वाचा घटक आहे.त्यांचे कष्टामुळे अनेक दैनिकांना भरभराटी आली आहे.मात्र या दैनिकांचे व्यवस्थापन आता अडचणीत असलेल्या एंजन्ट विक्रेत्यांना बेदखल करत आहे.अनेक वर्षापासून आम्ही मागण्या करूनही आमच्या हक्काचे कमिशन,डिपॉजिट वरील व्याज,पुरवणी भरणावळ दिली जात नाही.हा एकप्रकारे अन्याय आहे.त्यामुळे आम्ही आता गप्प बसणार नाही.या मेळाव्यात पुढील आंदोलनाची आम्ही दिशा ठरवली असून यापुर्वी अशीच आक्रमक आंदोलन करून आम्ही आमचा हक्क मिळविला आहे,आताही तो मिळवणारचं असा वज्रनिर्धार हणमंतराव निकम यानी केला.त्याला सर्व उपस्थित एंजन्ट व विक्रेत्यांनी एकमतानी पांठिबा दिला आहे.
यावेळी यशवंत निकम पलूस,संजय कोरे खेराडेवांगी,प्रदीप मोरे मांगले,अशोक मालवणे शेटफळे,धंनजय दौडे,संदिप कुलकर्णी,गजानन शेळके,शेबर सुतार कांरदवाडी यांच्यासह अनेक एंजन्टांना अडचणी मांडल्या.मोठ्या संख्येने एंजन्ट व विक्रेते यावेळी उपस्थित होते.
७० वर्षाचे एंजन्ट व महिला एंजन्टाची उपस्थितीगेल्या चार तपाहून जास्त काळ वृत्तपत्र एंजन्ट व विक्रेत्यांच्या अडचणी समस्या सोडविणारे क्रांतीकारी वृत्तपत्र एंजन्ट व विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव निकम यांच्या हाकेला साथ देत आटपाडी,व विटा तालुक्यातील ७० वर्षाचे वयोवृद्ध वृत्तपत्र एंजन्ट तुकाराम कृष्णा वाघमारे दिंघची व महिला एंजन्ट उपस्थिती हे संघटनेचे यश आहे.त्यांचा संघटनेवरील विश्वास नव्या एंजन्टांना प्रेरणादायी ठरला.हणमंतराव निकम आम्हाला न्याय मिळवून देणार अशा भावना यावेळी जेष्ठ विक्रेत्यांनी व्यक्त केल्या.