बाबासाहेबांच्या विचारानेच आपली प्रगती होईल | – उद्योगपती सी आर सांगलीकर 

0
मिरज : डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचे पालन करत आचरणात आणले तरच आपली प्रगती होईल आणि जीवनमान सुधारेल असे मत उद्योगपती सी. आर.सांगलीकर यांनी त्यांच्याच दान पारमितेतून लिंगनूर ता.मिरज येथे देण्यात आलेल्या बुद्ध मूर्ती स्थापन सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.बाबासाहेबांनी आपणास विज्ञान निष्ठ धम्म दिला आहे.धम्मात पंचशील असून पंचशीलाचे पालन केले तर आपल्या सर्वांचे जीवन सुखी व समृद्ध  होईल. त्याचं आचरण चांगल्या प्रकारे करा.बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म आपण आचरणात आणला पाहिजे. अपुरं काम करु नका तुम्हाला जिथं आवडेल तिथं राहा पण अर्धवट काही करू नका. तुम्ही द्विदा मन:स्थितीत राहू नका. धम्माबाबत तुम्हाला काय शंका असतील तर आमच्या सारख्यांना विचारा तुमचं शंका निरसन आम्ही करु.
यानंतर धम्मभूमी गुगवाड येथून आलेले भंते गोविंदो मानदो यांनीही सुंदर धम्म देसना दिली.लिंगनूरचे आर.आर. पाटील यांनी सांगलीकर यांच्या कार्याविषयी माहिती देत मनोगत व्यक्त केले.प्रमुख वक्ते बाबासाहेब नदाफ, जितेंद्र कोलप यांनी ही वेळे अभावी थोडक्यात मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध मूर्तीची ढोल ताशाच्या कडकडाटत भव्य मिरवणूकीने झाली.मिरवणूकीत खास ‘धम्मभूमी’ टि शर्ट घालून आलेली गुगवाडची मुले,उंट आणि रथ यांनी लिंगनूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते.मिरवणूकीनंतर भंते गोविंदो मानदो यांनी बुद्ध वंदना घेतल्यानंतर मा.सांगलीकर साहेबांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली.
यावेळी सरपंच मारुती पाटील, उपसरपंच चंद्रकांत नाईक, सह्याद्री उद्योग समुहाचे चंद्रकांत नलवडे, पोलिस पाटील मल्लया स्वामी, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार नलवडे भिमशक्ती जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ माने, बाळासाहेब भंडारे,बुद्ध मूर्ती दान समितीचे सचिन इनामदार तसेच प्रदीप कांबळे, महेश शिवशरण,किरण पाटील,गुगवाडचे विजय कांबळे,रवींद्र खांडेकरसह आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमशक्तीचे शशिकांत बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन परशुराम जाधव यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राप सदस्य कुमार बनसोडे,धोंडीराम बनसोडे,आप्पासाहेब बनसोडे,गौतम बनसोडे,आबासाहेब व पोपट बनसोडे आदींनी परिश्रम घेतले तर संयोजन अभिरा फौंडेशन,महिला समता सैनिक दल,समस्त बौद्ध समाज,क्रांतीचक्र युवा संघ यांनी केले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.