सांगली : विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत दि. 18 डिसेंबरपर्यंत सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यात 413 ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. या रथयात्रेत 83 हजार 712 व्यक्तिंनी सहभाग घेतला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी ही माहिती दिली.
आतापर्यंत कवठेमहांकाळ तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीमधील 3 हजार 598, कडेगाव तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 502, पलूस तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीमधील 5 हजार 885, तासगाव तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 609, वाळवा तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीमधील 2 हजार 576, जत तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीमधील 9 हजार 584, आटपाडी तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीमधील 3 हजार 213, मिरज तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीमधील 18 हजार 768, शिराळा तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीमधील 7 हजार 312, खानापूर तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीमधील 29 हजार 665 व्यक्तिंनी या रथयात्रेत सहभाग घेतला.
विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या देशव्यापी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती होऊन, त्यांना त्यांचा लाभ घेण्यास मदत होत आहे. ही रथयात्रा जिल्ह्यातील ग्रामीण भागात 8 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, किसान सन्मान, सुरक्षित मातृत्त्व, मातृवंदना, सुकन्या समृद्धी अशा केंद्र शासनाच्या जवळपास 50 हून अधिक योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन पात्र वंचित गरजू व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. या अनुषंगाने विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीत व्हॅनच्या माध्यमातून उपस्थितांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे. गरजू पात्र लाभार्थींनी नोंदणी करून, योजनांचा लाभ घेणे अपेक्षित आहे.