कळंब (जि. यवतमाळ) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय त्यातून झालेल्या वादातून जावयाने पत्नीसह व सासरा व दोन मेव्हण्यांची पहारीने हल्ला करून हत्या केली, या हल्ल्यात सासू गंभीर जखमी झाली. तिरझडा (ता. कळंब) येथे मंगळवारी,रात्री घडलेल्या या हत्याकांडाने खळबळ उडाली. आरोपी गोविंद पवारला (४०, रा.कळंब माथा, ह. मु.तिरझडा)न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. पत्नी रेखा गोविंद पवार, सासरा पंडित घोसले (५०), मेव्हणा ज्ञानेश्वर ऊर्फ नाना घोसले (३२), मेव्हणा सुनील घोसले (२८), अशी मृतांची नावे आहेत. सासू रुखमा पंडित घोसले (४७) ही गंभीर जखमी आहे.