बार्शीजवळील एसटी-दुचाकीचा अपघात,तीन जण जागीच ठार 

0

सोलापूर : बार्शीजवळ दुचाकी व एसटी बसच्या भिषण अपघातात दुचाकीवरील तीन ठार जागीच ठार झाले.तर अन्य एसटी बसमधील १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे. हा अपघात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी – धाराशिव रोडवरील तांदुळवाडी गावाजवळ झाला आहे.


अधिक माहिती अशी,आज गुरूवार दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एमएच ४० एएन ९७५६ ही राज्य परिवहन महामंडळाची बस पुण्याहून धाराशिवला चालली होती.दरम्यान बार्शीजवळच्या तांदुळवाडी गावाजवळ समोरून येणारी दुचाकी भरधाव वेगात येत थेट एसटी बसला धडकली. या अपघातात दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले असून अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
Rate Card

या अपघातात दोघांचे मृत्तदेह व दुचाकी ही एसटी बसच्या खाली अडकले असून क्रेनव्दारे दोघांचे मृत्तदेह काढण्यात आले आहेत.अपघाताची माहिती बार्शी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य गतीने करण्यात आले.भिषण अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.