राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारसीनुसार द्राक्ष पिकावरील रोगाचे व्यवस्थापन करा

0
10

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर फळ छाटणीनंतर ज्या द्राक्ष बागांमध्ये मणी सेटिंग झाले आहे, अशा बागांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून जीवाणूजन्य करपेची नव्याने लक्षणे दिसून येत आहेत. या लक्षणांमध्ये प्रामुख्याने मण्यांच्या टोकावर व मण्यांवर काळे तपकिरी लहान, गोलाकार ठिपके तसेच मणी कुज व मणी कोरडे होणे ही लक्षणे दिसून येत आहे. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे यांनी दिलेल्या शिफारसीनुसार व्यवस्थापन करावे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

पत्रकात म्हटले आहे, या रोगाबाबत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यामधून पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचे पॅथॉलॉजिकल तंत्रांचे अनुसरण करून विश्लेषण केले असता हा रोग Colletotrichum sp. बुरशी व Xanthomonas sp. जीवाणू प्रजातीच्या प्रादुर्भावामुळे होत असल्याचे कळविले आहे. हा रोग/विकृती व्यवस्थापनामाठी निर्यातक्षम बागांकरिता कोणतीही रसायने / बुरशीनाशके / जीवाणूनाशके न वापरता बॅसिलस सबटिलिस @2gm/L किंवा ट्रायकोडर्मा sp @ 2gm/L किंवा 2ml/L या जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा, अशी शिफारस केली आहे. तसेच इतर बागांकरिता कासुगामायसिन कॉपर ऑक्सीक्लोराईड @ 750 ग्रॅम/हे. अशी शिफारस केली आहे. तसेच बुरशीजन्य ठिपक्यांबाबत (ऍन्थ्रॅकनोज) हेक्साकोनाझोल @ 1ml/L वापरावे व जीवाणूजन्य ठिपक्यांबाबत Potassium salt of active phosphorus @ 4g/L + मॅन्कोझेब 2g/L वापरले जाऊ शकते असे सांगितले आहे. तसेच जीवाणूजन्य ठिपक्यांबाबत स्ट्रेप्टोसायक्लिनचा वापर करू नये, अशी शिफारस केली असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here