बिबट्याचा ढालगाव मध्ये धुमाकूळ, ४ कुत्र्यांना फाडले

0
17

ढालगाव तालुका कवठेमंकाळ येथील दाजी ज्ञानू घागरे यांच्या शेताच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे काहीच दिवसांपूर्वी दिसून आले होते. नव वर्षाच्या सुरुवातीलाच ढालगाव सारख्या दुष्काळी भागामध्ये बिबट्याने एन्ट्री केल्याने नागरीकांमध्ये भितिचे वातावरण पसरले होते. दिनांक १ जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ढालगावपासून साधारणत: १ किलोमीटर अंतरावर ढालगाव – कदमवाडी रोड जवळील बिरोबा मंदिर टेकडीजवळ बिबट्या आढळून आला होता.

 

काल दिनांक ६ जानेवारी रोजी रात्री ९ च्या दरम्यान बिबट्याने नागझरी मध्ये कशिलिंग अरुण घागरे यांच्या ४ कुत्र्यांवर हल्ला करून ठार केलेआहे तर आणखी २ कुत्रे जखमी असल्याची माहिती समजते आहे.

 

 

दरम्यान यावेळी काही जणांनीबिबट्याचा फोटो देखील काढला

बिबट्या हा वण्यप्राणी नागरीकापासुन दूर राहणे पसंद करतो. सहसा कोणावरही तो हल्ला करत नाही. नागरीकापासुन दूर राहणेचा बिबट्या प्रयत्न करतो.बिबट्या कोठेही दिसुन आल्यास कोणताही आरडा ओरडा न करता तसेच दगड किंवा अन्य कोणत्याही वस्तुने त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करु नये किंवा बिबट्याला कोणतीही इजा होणार नाही अशा प्रकारची काळजी घेतल्यास कोणावरही तो हल्ला करत नाही. तसे झाल्यास बिबट्या हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतीच्या परीसरात काम करताना मोठ्याने आवाज करणे व मोबाईल वर मोठया आवाजाने गाणी लावल्यास बिबट्या आपल्या आजुबाजुला असल्यास दूर निघुन जाईल. शेतीचे कामे करण्यासाठी २ ते ३ जणांचा ग्रुप करुन हाता मध्ये काठी घेवुन आरडा ओरडा करीत जावे. रात्रीच्या वेळी कोणीही एकटयाने बाहेर पडु नये. असे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी कवठेमहांकाळ यांनी काहीच दिवसांपूर्वी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here