तालुक्यातील सर्व तलाव विस्तारित म्हैसाळच्या वितरण नलिकेस जोडावेत :- आ.विक्रमसिंह सावंत | जलसंपदा विभागाचा जतेत आढावा

0
जत : जत तालुक्यातील सर्व विभागाचे‌ पाझर तलाव,साठवण तलाव,छोटे तलाव विस्तारित म्हैसाळ योजनेच्या वितरण नलिकेस जोडावेत,त्यासाठी प्रत्येक गावात संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे करावेत,असे निर्देश आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिले.जत तालुक्यातील भविष्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आ.विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजना आणि विस्तारित म्हैसाळ योजना संबंधित सर्व विभागांची आढावा बैठक संपन्न झाली.यावेळी आ.सावंत यांनी येत्या काळात टंचाई भासणार यांची खबरदारी घ्यावी,शक्य आहेत,ते तलाव,बंधारे,म्हैसाळ योजनेतून भरावेत अशा सुचनाही अधिकाऱ्यांनी दिले.

या बैठकीस म्हैसाळ योजनेचे अधिक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ,कार्यकारी अभियंता ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग ,कार्यकारी अधिकारी म्हैसाळ पंपगृह विभाग क्र.२ सांगली ,कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ , जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण अधिकारी जि.प.सांगली ,जिल्हा जलसंधारण आणि उपवन संरक्षक (कुपवाड) वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Rate Card
यावेळी सध्या सुरु असलेल्या म्हैसाळ योजनेच्या पाणी वितरणावर चर्चा करण्यात आली.तालुक्यातील कार्यक्षेत्रातील सर्व गावातील शेती ओलीताखाली आले पाहीजे.तसेच सर्व गांवाना पाणी मिळणे साठीचे नियोजन करून नियोजानाप्रमाणे शेवटच्या गांवापासून ते हेडकडे पाणी मिळवे असे नियोजन केले जावे.तसेच येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये टंचाई स्थिती मोठ्या प्रमणावर जाणवू शकते.त्याकरिता टंचाईच्या अनुषंगाने आवश्यक ते तलाव आताच भरून घेणेबाबत आदेश दिले.वळसंग,शेड्याळ ,दरीकोनुर आणि अमृतवाडी आणि परिसरातील गावांना पाणी आजच्या आज पाणी सोडणेत यावे असे सांगितले.

 

विस्तारित म्हैसाळ योजनेच्या वितरण व्यवस्थेचा वस्तुनिष्ठ परिस्थिती त्यात्या गावामध्ये जाऊन सर्व्हे  करून तालुक्यातील सर्व विभागाकडील तलाव,को.प.बंधारे,छोटे तलाव,पाझर तलाव,साठवण तलाव विस्तारित म्हैसाळ योजनेच्या वितरण नलीकेस जोडणेत यावेत,जलसंधारण विभागाकडील सर्व प्रस्तावित तलावांच्या जागा पाहणी करून तोही भाग विस्तारित म्हैसाळ योजनेस जोडणेबाबत कार्यवाही करण्याचे ठरले.म्हैसाळ आणि विस्तारित म्हैसाळ योजनेच्या शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची भरपाई तातडीने देणेत यावेत.वळसंग येथील भोसले तलावाचे पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करणेत आली.यावेळी आ.विक्रमसिंह सावंत यांच्या सर्व वरिष्ठ अधिकारी,जत तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग,सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजय शिंदे ,युवराज निकम,भूपेंद्र कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.