बिरनाळ तलावातील पाण्यावर आता आरक्षण,शासनाने दिली मंजूरी | वाचा सविस्तर बातमी…

0
16
जत : जत शहराच्या पिण्याच्या पाण्याचा  प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सातत्याने प्रयन्नशील होतो. याप्रश्ना संदर्भात आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अनेक वेळा विधानभवनात आणि जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला होता.मागणीची पुर्तता झाली असून जत शहरासाठी बिरनाळ तलावातील म्हैसाळ योजनेचे पाणी आरक्षणास मंजूरी मिळाली आहे.त्यामुळे जत शहराचा पाणीप्रश्न आता लवकरच मार्गी लागणार असल्याचे आ.सावंत यांनी सांगितले.
जतचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना येथील पाणी प्रश्नावर सातत्याने काम करीत आलो आहे. जत शहराची वाढती  लोकसंख्या विचारात घेऊन शहरासाठी नवीन पाणी योजना मंजूर होणेसाठी शाश्वत जलस्रोत असणे गरजेचे होते. गेल्या अनेक दिवसापासून शहराला पाणी पुरवठा करताना अनेक अडि-अडचणी येत होत्या प्रामुख्याने कायम स्वरूपी जलस्रोत उपलब्ध नव्हता त्यामळे पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. त्याच अनुषंगाने जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर यांची भेट घेतली.जत शहराचा पाणी प्रश्न सुटण्यास यामुळे मदत होणार असल्याचे आ.सावंत यांनी सांगितले.यावेळी माजी नगरसेवक निलेश बामणे उपस्थितीत होते.
जत शहराचा पाणी प्रश्न सुटणार..
जत शहरासाठी बिरनाळ तलावातील म्हैसाळ योजनेचे पाणी आरक्षण मंजूर झाले असून आता अमृत 2.0 ही नळपाणी पुरवठा योजनेची मंजूर केली जाणार आहे.जतचा पाणी प्रश्न पुर्णत: सुटेल असा विश्वास आ.सावंत यांनी व्यक्त केला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here