जत : म्हैसाळ योजनेचे पाणी आवंढी परिसरात आले आहे परंतु काही भागात पाणी आले नाही म्हणून प्रगतशील शेतकरी संभाजी कोडग,उद्योजक अंतू शिंदे व दिनेश सोळगे सर सातत्याने गेले वर्षभर खासदार संजयकाका पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांचे कडे पाठपुरावा करत होते आज त्या प्रयत्नाला यश आले.
कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी सूचना दिलेप्रमाणे मनिकनगर येथून सोळगे,येडगे तसेच जाधववस्ती इथपर्यंत साधारण 3 किमी पाइपलाइन टाकून जवळपास 500 एकर क्षेत्राला लाभ होणार आहे.त्या कामाचे भूमिपूजन सोहळा जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांच्याहस्ते संपन्न झाला.
यावेळी भाजपा तालुकध्यक्ष प्रमोद सावंत,पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र सावंत,उपसरपंच अविनाश सावंत,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप,प्रगतशील शेतकरी संभाजी कोडग,उद्योजक अंकुश शिंदे व,दिनेश सोलगे,अरुण कोडग शेठ,उपसरपंच अमोल पाटील,संजय पाटील,युवराज काशीद,पांडुरंग सोळगे,भारत कोडग महाराज,वसंत कोडग,हणमंतकोळी,महेश कोडग,वसंत सर अनेक शेतकरी उपस्थित होते.तसेच यावेळी खासदार संजयकाका पाटील यांचे माध्यमातून 25/15 या योजनेतून संत बाळू मामा मंदिराचे सभोवती पेविंग ब्लॉक बसिवेने कामाचे भूमिपूजन ही संपन्न झाले.